तळोधी बा.चे सरपंच वर अविश्वास ठराव पारित झाल्याने सरपंचा पाय उतार

तळोधी बा.चे सरपंच वर अविश्वास ठराव पारित झाल्याने सरपंचा पाय उतार

तळोधी बा :
         नागभीड तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्य संख्या असलेल्या तळोधी बा. ग्रामपंचायत  सरपंच सौ. छाया घनश्याम मदनकर यांच्या मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त झाली होती तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना विचारात न घेणे, सरपंच आपल्या मनमानी  ने ग्रामपंचायत चे कामे करणे, ग्रामपंचायत मध्ये हजर न राहणे, ग्रामपंचायत सदस्यांशी गैरवर्तन करणे आदी कारणाने नागभीड तहसिल कार्यालयात १३सदस्यच्या स्वाक्षरी ने अविश्वास प्रस्ताव १२ जुनला नागभीड तहसिल कार्यालयात सादर करण्यात आला होता. 
   आज १९जुन रोजी  अविश्वास प्रस्ताव च्या अनुषंगाने नागभीड चे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३५(२) अन्वये सोमवार ला दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालय तळोधी बा. येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये अविश्वास प्रस्ताव वर चर्चा करण्यात आली.यामध्ये निवडणूक अधिकारी तहसीलदार यांनी हात वर करून मतदान घेण्यात आले.सरपंच विरोधात १३ विरूद्ध ३ व एक सदस्य तटस्थ राहिले.त्यामुळे सरपंच सौ. छाया घनश्याम मदनकर यांना अखेर पाय उतार व्हावे लागले.कुठल्याही प्रकारची शांतता भंग होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. तळोधी बा. ग्रामपंचायत चे नवीन सरपंच कोण होणार याकडे मात्र जनतेचे तर्कवितर्क व्यक्त केले जाते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]