सादागड हेटी येथील तलावाच्या कामाला सुरवात - विजय कोरेवार यांच्या प्रयत्नाला यशसावली - तालुक्यातील सादागड हेटी येथील तलावाची पाळ व गेट ऐन पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे फुटल्याने पाणी निघून गेले, शेतात उपसा बसून शेतपिक वाहून गेले. जे पीक होते ते सिंचना अभावी पिके करपायला लागली. शेतकऱ्यांनी तात्पुरती बंधारा बांधून पिके वाचवली. परंतु कायमस्वरूपी सिंचनाकरिता बांधकाम करणे आवश्यक असतांना मात्र आघाडी शासनाच्या काळातील मंजूर कामे रोखण्यात आली होती. शेतीच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न असल्याने पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी शेतकऱ्यांना घेऊन सदर कामासाठी सतत पाठपुरावा केला व माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ही अडचण लक्षात घेऊन कामाला सुरवात करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. सदर तलावाच्या कामाला पावसाळापूर्वी सुरवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]