प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती मुल तर्फे निरोप समारंभ तसेच स्वागत सोहळा संपन्न
          पंचायत समिती येथील सभागृहामधे प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती तर्फे वैभव खांडरे साहेब गटशिक्षणाधिकारी यांची मुल येथून बदली झाल्यामुळे त्यांचा समारोपीय सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वर्षाताई पिपरे यांनी नुकताच गटशिक्षणाधिकारी यांचा पदभार स्वीकारला त्यामुळे त्यांचा स्वागत सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी जयश्री गुज्जनवार शि वी अ मुल, गजेंद्र कोपूलवार केंद्र प्रमुख भेजगाव, कोरडे सर केंद्रप्रमुख मारोडा, यांच्या प्रमुख उपस्थितीत व समन्वयक नंदकिशोर शेरकी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल निमगडे यांनी केले.कार्यक्रमा प्रसंगी सुंदर मंगर,जगदीप दुधे,लक्ष्मण सोयाम, अल्काताई रेवतकर रत्नमाला गेडाम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागतपर भाषणात शिक्षकांना योग्य प्रकारे सहकार्य करेन व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन त्याचप्रमाणे शिक्षकांनीसुद्धा गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करावे असे सांगितले. वैभव खांडरे साहेब यांनी आपल्या कार्यकाळातील शिक्षकांच्या समस्या व आपल्या प्रशासनातील अनुभव विषद केले. व कार्य पार पाडीत असतांना शिक्षक संघटना व सर्व शिक्षकांनी चांगले सहकार्य केले असे मत व्यक्त केले.


      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल तिवाडे, कविराज मानकर,अशोक पाऊलकर, सुखदेव मांदाडे, कोलबोकवार
, क्रिष्णा बावणे, छबन कन्नाके, गोविंदा सोनटक्के, विद्या देवगडे, मनोज बंडावार, त्याच प्रमाणे पंचायत समिती मुलचे सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी प्रयल केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रत्नमाला गेडाम यांनी केले.समारोप व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]