सावरगांव वासियांचे आरोग्य धोक्यात घरात, अंगणात, धुराचे आवरण.

  
       चुराई मशीनने गावातच करतात कटाणमालाची पिसाई.
यश कायरकर,
 नागभीड तालुक्यातील सावरगांव येथील एका प्रतिष्ठीत शेतकऱ्यांचे मुलाने शेतातील भुईमूग घरी आणून गावामध्येच विलासजी मुंगमोडे यांच्या घराकडे भुस्याचा धुर उडवित भूईमूगाचे चुरणा करण्याची मशीन लावली. त्यामुळे त्यांच्या अंगणात, घरात, विहीरीत, झाडांवर, मोठा भुस्याचा थर गोळा झाला, व आजुबाजुला सर्व घरे व घरातील लोकांच्या आरोग्याची, जीवाची पर्वा न करता मनमानी पद्धतीने मशीन सुरु ठेवली. यामुळे लोकांच्या घरात जेवणाच्या भांड्यांवर व पिण्याच्या पाण्यावर वगैरे कचऱ्याचा धुरांडा बसला, सर्वत्र धुळीचे डोंगर तयार झाले. श्वास घेणे कठीण झाले, घराजवळच्या एका विधवा महिलेने याबाबतीत ग्रामपंचायतला  तक्रार करून ही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रोगराईचे वातावरण तयार झाले. सर्व धुळीचे कण आसमंतात विखुरले गेले. 

         
        ही बाब सावरगाव वासियांच्या करताना नवीन नाही गावातील  काही मोजके मोठे शेतकरी व ज्यांच्याकडे कठाण माल पिसाई ची मशीन आहेत ते शेतातील संपूर्ण कठाण माल गावात जमा करून आणून नंतर आपापल्या घरात च्या बाजूला गावातच त्या, तुअर,लाखोरी, उडीद, भुईमूग, करडी, अशा मालाची पिसाई करतात.  त्यामुळे परिसरातील संपूर्ण लोकांच्या घरावर धूर बसून घरातील जेवणाच्या भांड्यांवर,  पाण्यामध्ये,  कपड्यांवर, सर्वीकडे गावभर धुळीचे वातावरण निर्माण होते.


       याच प्रमाणे सावरगावात बस स्टॉप जवळ असलेली 'स्वास्तिक राईस मिल' या राईस मिल मुळे सुद्धा आजूबाजूला असलेल्या लोकांच्या घरांवर , छपरावर, त्यांच्या झाडांवर ,  वाळू टाकलेल्या कपड्यांवर,  आणि स्वयंपाक खोलीपर्यंत जेवणाच्या भांड्यांवर,  सुद्धा  धुर भुस्याचा थर गोळा होतो.  याबाबत सुद्धा ही डोकादुखी ढरलेल्या राईस मिल परिसरातील लोकांनी ग्रामपंचायतला वारंवार निवेदन देऊन राईस मिल मालकाला या धुळ्याचा बंदोबस्त करायला सांगितले व ग्रामपंचायतला त्याकडे लक्ष द्यायला सांगितले मात्र अशा प्रदूषणाच्या तक्रारीकडे सावरगाव ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असून यामुळे गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.  यामुळे आधीच गळ्यात खसखस, शरीरावरची खाज,  अशा प्रकारचे खूपसे त्वचारोग गावातील लोकांना झालेले आहेत. 
 तर या संपूर्ण बाबी करता नेमका जिम्मेदार कोण..? अशा प्रकारे गावात मशीन लावून कठानमाल पिसाई करून गावभर प्रदुषण करून लोकांच्या आरोग्याशी खेळनारे  मशीन मालक, काही नेमके  शेतकरी , राईस मिल मालक की, जिम्मेदार ग्रामपंचायत..? हाही प्रश्न लोक आता विचारायला  लागलेले आहेत.
       यामुळे आता ग्रामपंचायत ने ठोस पावले उचलून असे गावभर प्रदूषण करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी असे गावातील लोकांनी एकजुटीने मागणे केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]