सावरगाव परिसरामध्ये विजेचा लपंडाव. दर पाच-दहा मिनिटांनी दिवस भरात पन्नास - शंभर दा विजपुरवठा बंद होत असल्यामुळे लोकांना सहन करावा लागत आहे गर्मीचा त्रास


भीषण गर्मीमध्ये दिवसभर विद्युत विभागाचे हलगर्जीपणा.
 तळोधी बा (यश कायरकर) ,
      नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरातील वाढोना, गंगासागर हेटी , उश्राळा मेंढा, आलेवाही, आकापुर, खरकाळा, जीवनापूर , हस्तानपुर, सावरगाव या परिसरामध्ये एवढ्या भीषण गर्मीमध्येही विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे दिवस-रात्र लोकांना भीषण गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. 
      मात्र काही असो येत्या आठवड्याभरा पासून सुरू असलेला हा विजेच्या लपंडावाचा त्रास दर पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने दिवस रात्र अचानकच गायब होणारी वीज ही लोकांना त्रासदायक ठरत आहे. एकीकडे विद्युत विभाग ग्राहकांना विज बिल भरण्याकरता  एक दिवस सुद्धा अतिरिक्त मुद्दत देत नाही आणि वारंवार येऊन वसुली किंवा इलेक्ट्रिक कट करतात. तर दुसरीकडे शंभर टक्के वसुली होऊनही आणि त्यातल्या त्यात वीज बिलात भरमसाठ वाढ होऊन सुद्धा अशा प्रकारे दिवसभरातून पन्नास - शंभर दा विद्युत पुरवठा खंडित होणे हे वीज ग्राहकांना डोकेदुखी ठरत असून यामुळे परिसरात विद्युत विभागाच्या बाबतीत रोष निर्माण झालेला असून आता लोकांनी गर्मीतच आंदोलन छेडण्याचा बेत आखला आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. 
          पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वादळ वार्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून अशा प्रकारची वीज खंडित होण्याची प्रक्रिया ही नेहमीच होते. मात्र जर भर उन्हाळ्यातच सर्व वातावरण शांत असताना अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या पीक सीझनमध्ये पावसाळ्यात विजेचे काय हाल असेल..? असाही प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. याकडे मात्र विद्युत विभागाचे कर्मचारी कुठल्याही प्रकारे गंभीरतेने लक्ष देत नसून फक्त वसुली हाच त्यांनी धोरण अवलंबलेला आहे . तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याचे मागचे कारण शोधून त्यावर स्थायी तात्काळ उपाय शोधून काढावा असे लोकांचे मागणे आहे.
          या बाबतीत विद्युत विभागाशी संपर्क साधले असता परिसरात सावरगाव येथील लाईनमन वाघ त्यांनी "परिसरातील सुरू असलेल्या गोसीखुर्द कालव्याच्या अनियंत्रित कामांमुळे व त्यांच्या नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या उपकरणांच्या कामामुळे विद्युत तारेवर कधी झाड पडुन, तर त्यांच्या मशिनरीज विद्युत खांबाला आपटणे,  त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले." मात्र या बाबतीत  त्यांनी गोसेखुर्द कालव्याचे काम करणार्या व विद्युत पुरवठा खंडित होण्याचे कारण असलेल्यांवर त्यांच्यावर का कारवाई केली नाही असे विचारले असता वलनी फिडर चे अभियंता मामेटपल्लीवार यांनी काही सांगितले नाही. आणि "मला या बाबतीत काही माहिती नाही व  उलट आम्हाला विचारुन तुम्ही लिहीता काय..?" असे असले उत्तर दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]