तहसीलदार मॅडम च्या कार्यालयाला भर दिवसा कार्यालयीन वेळेत सुद्धा ताला

जनतेची धावपळ सुरू आणि शासकीय यंत्रणा झोपेत 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.२० जून २०२३ चिमूर तालुका हा संपूर्ण भारतात नावाजलेला असून भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर चिमूर या गावाला स्वातंत्र्य मिळाले.तसेच शासकीय कार्यालयाचा ५ दिवसाचा आठवडा झाला असून सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०६:०० असे वेळापत्रक आहे.असे असतांना सुद्धा ०५:०० वाजताच चिमूर तहसील च्या तहसीलदार यांच्या कार्यालयाला भर दिवसा ताला असल्यामुळे तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागत आहे. विविध कामासाठी तालुक्यातील सामान्य जनता रोज मजुरी तसेच रजा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात शैक्षणिक कामासाठी येत असतात परंतु आल्या पाऊली त्यांना परत जावे लागते.आता मुलांच्या शाळा सुरू होणार म्हणून पाल्यांची शैक्षणिक दस्तावेज करीता धावपळ सुरू झाली आहे. परंतु कार्यालयाला ताला दिसून येतात जनतेला प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. अशी हि घटना पहिल्यांदाच घडली नसून अनेकदा चिमूर तहसील कार्यालयात हा प्रकार घडून आला आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन असे प्रकार का वारंवार घडतात याबाबतचा आढावा घ्यावा व अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी जनतेकडून मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]