नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीचे धरणे आंदोलन..!! मुसळधार पावसात आणी विजांच्या कडकडाटात ही आंदोलन सुरु..!!
•नागभीड जिल्हा मागणीला पावसाचाही पाठींबा..!!
नागभीड: नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने नागभीड जिल्हा मागणी व चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कक्षेत नागभीड तालुक्याच्या समावेश निषेधार्थ सुरु असलेले आंदोलन अतिशय वेगवान पद्धतीने समोर जात आहे.. 
   आज नागभीड जिल्हा मागणी साठी व चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कक्षेत नागभीड तालुक्याचा समावेश राज्य सरकारणे केल्याच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालया जवळ नियमांचे पालन करीत धरणे आंदोलन करण्यात आले.. आंदोलन सुरु असताना अचानक वातावरण बदलले मुसळधार पावसाला सुरुवात झाली तरी आंदोलन कर्ते घोषणा देत होते आंदोलन करीत होते..आजच्या धरणे आंदोलनाला नागभीड तालुक्यातील ग्रामीण भागातून लोक आले होते तसेच नागभीड मधील विविध पक्षाचे,सेवाभावी संस्थाचे मान्यवर उपस्थित होते..सरते शेवटी नागभीड तहसील चे तहसीलदार मा.मनोहर चव्हाण यांना निवेदन देत धरणे आंदोलनाची सांगता झाली..!!
  कृती समितीच्या वतीने विविध मान्यवारांना निवेदन देणे सुरु असून काल चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना चिमूर येथील निवास स्थानी जाऊन निवेदन देण्यात आले....!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]