अबब आधार कार्डवर चक्क उप मुख्यमंत्र्यांचा फोटो


उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - शासनाने प्रत्येकाला आधार कार्ड काढणे सक्तीचे केले आहे त्यामुळे जन्मलेल्या बाळापासून तर वृद्धा पर्यंत प्रत्येक जण हे आधार कार्ड काढत असतात परंतु शंकरपूर मध्ये चक्क एका मुलाच्या आधार कार्डवर मुलाचा फोटो न छापता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापून आपल्या अकलेचे दिवाळे या आधार कार्ड केंद्र वाल्यांनी केले आहे.जिगल जीवन सावसाकडे हा आठ वर्षांचा मुलगा आहे तो सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील रहिवासी आहे. या मूलाच्या आई चे माहेर हे शंकरपूर जवळील शिवरा येथील आहे. त्यामुळे तीने  सन २०१५ मध्ये शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एका बाळाला जन्म दिला ते बाळ सहा महिन्याचे झाल्यावर त्याचे आधार कार्ड काढण्यासाठी शंकरपूर येथे सन २०१६ मध्ये शिबीर घेण्यात आले होते त्या शिबिरात त्या मुलाचा आधारकार्ड काढण्यात आला परंतु त्या कार्डवर त्या बाळाचा फोटो न येता चक्क उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आलेला आहे एवढी मोठी चूक ज्यांनी आधार कार्ड काढलं त्या ऑपरेटर च्या लक्षात आली नाही ही एक शोकांतिका आहे.हि चूक त्या मुलाच्या आईच्या लक्षात आली परंतु लहान मुलांचे आधारकार्ड दर पाच वर्षांनी अपडेट करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे ते आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शंकरपूर ग्राम पंचायत येथे जन्माचा दाखला घेण्यासाठी ती आली होती.याबाबत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र भर याबाबतची चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]