नाना पटोले "भावी मुख्यमंत्री" मूल येथे लागले पोस्टर

नाना पटोले "भावी मुख्यमंत्री" मूल येथे लागले पोस्टर


विद्यमान विधानसभेची मुदत संपायला दीड वर्षाचा अवकाश असला तरी, भावी मुख्यमंत्री कोण? यावरचा कलगीतुरा महाविकास आघाडीत अद्यापही कायम आहे.  अशातच मूल शहरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले पोस्टर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाची मिळून राज्यात महाविकास आघाडी आहे. कोण किती जागावर निवडणूक लढविणार किंवा मुख्यमंत्री कोणाचा होणार?  हे अद्यापही ठरले नसले तरी तीनही पक्षाचे कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा कार्यक्रम पुढे ठेवला आहे. नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून केलेला उल्लेख आहे याचाच एक भाग आहे काय?  असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून केलेला उल्लेख चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, शरद पवार यांची कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून जागोजागी पोस्टर "वार" केला होता. आता नाना पटोले यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून मुल येथील कार्यकर्त्यांनी त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करीत पोस्टर लावल्याने महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून चांगलीच जुंपेल असे चित्र निर्माण झाले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]