वैनगंगा पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी केली वारी

पवनीत अवतरली पंढरी

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - स्थानिक वैनगंगा पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून चिमुकल्यांनी पालखी दिंडी काढून वारी केली.सर्वप्रथम पालखी दिंडीचे पूजन वैनगंगा पब्लिकच्या प्राचार्या लीना कोरेकर जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या मयुरी वैद्य  यांनी पूजन केले.  दिंडीचे संचालन वैनगंगा विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप घाडगे यांनी केले. विद्यार्थ्यांनी जय जय राम कृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करीत तुळशीचे वृंदावन डोक्यावर घेऊन चिमुकल्या विद्यार्थिनी वृक्षरोपणाचा संदेश देत होत्या. दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचली तेथे मंदिरातील विश्वस्तांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर माऊली माऊली विठू माऊली या गीतावर नृत्य सादर केले. चिमुकल्या वारकऱ्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष केला. त्यानंतर मंदिर समिती द्वारे प्रसाद वितरण करण्यात आला याप्रसंगी दत्तू मुनरतीवार, पत्रकार अशोक पारधी , राम भेंडारकर, प्रकाश रेहपाडे, अमित पारधी, सुनील वरवाडे उपस्थित होते. वैनगंगा पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.केला. त्यानंतर मंदिर समिती द्वारे प्रसाद वितरण करण्यात आला याप्रसंगी दत्तू मुनरतीवार, पत्रकार अशोक पारधी , राम भेंडारकर, प्रकाश रेहपाडे, अमित पारधी, सुनील वरवाडे उपस्थित होते. वैनगंगा पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]