पहिल्या अल्पशा पावसाने सावरी ग्रामपंचायत चं पितळ उघडं

सावरी व माकोना गावात पसरले घाणीचे साम्राज्य
 
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - सावरी गावाचा विकास कुठे आहे हे दिसेनासे झालेले आहे.अनेक समस्यांना तोंड देत गाव विकासात नसून भकासात गिनले जात आहे .याची प्रचिती आज ग्राम पंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे महत्त्वाचे होते. परंतु ग्राम पंचायत प्रशासन यांच्या भोंगळ कारभारामळे नाली सफाई झाली नाही व आज पावसाळ्यातला पहिला पाऊस पडला त्या पावसामुळे नालीची सर्व घाण तसेच कचरा हा रस्त्यावर वाहत येऊन  पडला तर काही ठिकाणी लोकांच्या घरात सुद्धा नालीचे घाण पाणी गेले याला कारणीभूत ग्राम पंचायत चे कर्मचारी अधिकारी व लोक प्रतिनिधी सुद्धा आहे. आज सावरी गावामध्ये हि परिस्थिती उद्भवली नसती पण सावरी येथे विविध ठिकाणी होणाऱ्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे.याला एकही या लोक प्रतिनिधी उत्तर देत नाही  अशी चर्चा सुजाण नागरिकांना मध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.आज स्वच्छता नाही तर केव्हा होईल याकडे सुद्धा स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]