मजरा (लहान ) येथे प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार. शालेय साहित्य देऊन गौरव...
वरोरा...जगदीश पेंदाम
 तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॅक मजरा लहान येथे माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ , नोटबुक व पेन देऊन तसेच पेढा भरवून त्यांचे कौतुक करण्यात आले. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून चेतना माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मजरा लहान येथील कुमारी साक्षी केराम ही ८१.८० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली आली तर प्रणय कळस्कर ८१.६० टक्के घेऊन दुसरा व कुमारी साक्षी राऊत ही ७८.६० टक्के गुण घेऊन शाळेतून तिसरा येऊन मजरा गावाचे नाव रोशन केल्याने त्यांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सारिका धाबेकर, ग्यानीवंत गेडाम यांनी स्वखर्चाने गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करून त्यांना पेन, बुक,व शालेय साहित्याचे वाटप केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मजरा लहान येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करत परंपरा कायम राखली.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दीक्षा धाबेकर यांनी दहावीनंतर काय? यावर उत्कृष्ट व सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ता ग्यानीवंत गेडाम, सामाजिक कार्यकर्त्या सारीका धाबेकर, सीआरपी माधुरी पिंगे, रमा गेडाम, कलावती काळे, दीक्षा धाबेकर व दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उपस्थित होते.
वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॅक मजरा लहान येथे माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ , नोटबुक व पेन देऊन तसेच पेढा भरवून त्यांचे कौतुक करण्यात आले. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून चेतना माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मजरा लहान येथील कुमारी साक्षी केराम ही ८१.८० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली आली तर प्रणय कळस्कर ८१.६० टक्के घेऊन दुसरा व कुमारी साक्षी राऊत ही ७८.६० टक्के गुण घेऊन शाळेतून तिसरा येऊन मजरा गावाचे नाव रोशन केल्याने त्यांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सारिका धाबेकर, ग्यानीवंत गेडाम यांनी स्वखर्चाने गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करून त्यांना पेन, बुक,व शालेय साहित्याचे वाटप केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मजरा लहान येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करत परंपरा कायम राखली.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दीक्षा धाबेकर यांनी दहावीनंतर काय? यावर उत्कृष्ट व सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ता ग्यानीवंत गेडाम, सामाजिक कार्यकर्त्या सारीका धाबेकर, सीआरपी माधुरी पिंगे, रमा गेडाम, कलावती काळे, दीक्षा धाबेकर व दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]