कार ची ट्रॅव्हल्स ला धडक: सहा ठार मृतकात बालिकेचा समावेश..नागभीड- नागपूर महामार्गावरील कानपा येथील घटना..


यश कायरकर,(तालुका प्रतिनिधी,)
नागभीड: 
           नागपूर वरून नागभीड कडे येणाऱ्या MH 49 BR 2242 या क्रमांकाच्या मारुती सुझुकी अल्टो या कारने नागभीड वरून नागपूर कडे जाणाऱ्या MH 33 T 2677 या क्रमांकाच्या ARB ट्रॅव्हल्स ला नागभीड पासून 15 किमी अंतरावर असलेल्या कानपा येथे सहा दिल्याने कार मधील सर्व सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे.. मृतकामध्ये रोहन विजय राऊत (30) नागपूर, ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (50), सुनीता रुपेश फेंडर (40),नागपूर, प्रभा शेखर सोनवणे  (35) लाखनी जी.भांडरा, यामिनि फेंडर (9) नागपूर अशी मृतकांची नावे आहेत... मिळालेल्या माहितीनुसार रुपेश विजय राऊत  एक हे गेल्या एक  वर्षापासून विभक्त राहत असलेल्या आपल्या पत्नी व मुलाला भेटायला ब्रम्हापूरी तालुक्यातील किन्ही या गावी आपला भाऊ,आई व इतर नातेवाईक यांच्या सोबत आपले नागपूर येथील शेजारी  रोशन तागडे यांच्या गाडीने जात होते... कानपा येथे सुमारे 3.30 ते 4.00 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला.. अपघाताची माहिती होताच  नागभीड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक योगेश घारे आपल्या कर्मचाऱ्यासह घटना स्थळी पोहचले व व खंती ने मृतकांना बाहेर काढले यात दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला व एक बालिका व महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले या पैकी प्रभा सोनवाने हिचा जखमी अवस्थेत नागभीड येथील रुग्णालयात मृत्यू झाला तर  यामिनी रुपेश फेंडर (9) वर्षे हिचा नागपूर येथे रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला...!!!दरम्यान पोलिसांनी घटनेची नागभीड नातेवाईकांना दिली व ट्रॅव्हल्स व चालक  राजेंद्र लाकडू वैरकर रा.मेंडकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली...
• हा अपघात इतका भिषण होता की कारचा चेंदा मेंदा झाल्याने पोलिसांनी तात्परता दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने खंती ने कारचे दरवाजे तोडून फसलेल्या मृतकांना व जखमीना बाहेर काढले.. जखमी लहान मुलीला ठाणेदार योगेश घारे यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यासोबत नागपूर येथील रुग्णालयात पाठवले...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]