किटाळी बोरमाळा येथील ग्रामपंचायत मधील शिपाई पदाची भरती पारदर्शक पणे करण्याची पत्रकार परिषदेत मागणी.
तळोधी बा. 
        नागभीड तालुक्यातील ९ सदस्य संख्या असलेल्या किटाळी बोरमाळा ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदाची भरती करण्यासाठी गावकरी वर्गाच्या वतीने दोन वर्षापासून मागणी केली जात असताना मात्र त्या कडे कानाडोळा करून पारदर्शक पद्धतीने शिपाई पदाची भरती चा ठराव न घेता रोजंदारी तत्वावर काम करीत असलेल्या व्यक्तीला परस्पर ठराव घेऊन शिपाई पदासाठी भरती केल्याने गावकरी वर्गावर अन्याय झाला असून पारदर्शक पणे शिपाई पदाची भरती करण्याची मागणी तळोधी बा. येथील साईबाबा देवस्थान येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत किशोर देवराव कोलते यांनी केले आहे. 
      किटाळी बोरमाळा ग्रामपंचायत मध्ये १५ वर्षापासून होमराज तुकाराम मेश्राम पाणी पुरवठा म्हणून रोजंदारी तत्वावर काम करत होते. तर होमराज तुळशीराम भाकरे हे दोन वर्षापासून रोजंदारी तत्वावर शिपाई म्हणून काम करीत होते. मात्र शिपाई पदाकरिता ग्रामपंचायत च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया न करता परस्पर ग्रामपंचायत कमेटी ने ठराव मंजूर करून शिपाई पदाकरिता होमराज तुळशीराम भाकरे यांना कायमस्वरूपी शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात यावी असा ठराव ३१मार्चला घेऊन जनतेची फसवणूक केल्याचे आरोप कोलते यांनी केला आहे. शिपाई पदाची भरती करताना आर्थीक देवाणघेवाण झाल्याचे आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. ही निवड प्रकिया चुकीचे असून पारदर्शक पद्धतीने शिपाई पदाकरिता जाहिरात प्रकाशित करून पदाची भरती करण्यात यावी मागणी पत्रकार परिषदेत किशोर देवराव कोलते यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]