इलेक्ट्रिक वीज वाहिनीवर वेल, झाडाच्या फांद्या आल्याने अपघाताची शक्यता...वरोरा.....जगदीश पेंदाम

 तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाली असून शेगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह रस्त्यावर झाडे कोसळली असतानाच अशातच ग्रामीण भागामध्ये वीज वाहिनीवर ठिकठिकाणी इलेक्ट्रिक खाब्यावर वेल व झाडाच्या फांदी आल्याने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला असून याकडे महावितरण विभागाचे अधिकाऱ्यांच्या अक्षरच्या दुर्लक्ष होतांना दिसत आहे..
पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ सुटून अनेक ठिकाणी वीज वाहिनीचा तारा तुटत असल्याने शेगाव सहीत ग्रामीण भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित होत असतात, पावसाळ्या अगोदर विद्युत खांबावरती असलेले तारा, झाडाच्या फांद्या तोडुन सफाई करायचे काम करणे अनिवार्य असताना सुद्धा याकडे महावितरण अधिकाऱ्यांत दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेगाव परिसरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]