कृषी संजीवनी सप्ताहचा प्रारंभ मोठया उत्साहात साजरा......




    वरोरा......जगदीश पेंदाम
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने यावर्षी दि.२५ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह मोठ्या उत्साहात तालुक्यात साजरा करण्यात आला आहे..
वरोरा तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावाती दि. २५ जुन ला  तालुक्यातील अर्जुनी तुकुम चारगाव खुर्द ,धानोली,पाचगाव,बोरगाव भोसले,आदी या गावात सप्ताहाचा पहिला दिवस कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात
आला यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, कपाशी, तूर, व धान पिकातील सुधारीत तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात आली आहे तसेच यामध्ये सोयाबीन उत्पादन वाढीसाठी राबवायची अष्टसूत्री, बीबीएफ ,पट्टा व टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड, कापूस पिकाची विषम अंतर व रुंद सरी वरंभा लागवड, खत व तण व्यवस्थापन,भात बियाणे ची मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया इ.विषयावर सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी विजय काळे,कृषी पर्यवेक्षक प्रफुल्ल आडकीने, कृषी सहाय्यक पवन मत्ते,पवन मडावी व रोशन डोळस यांनी सभेच्या माध्यमातून करण्यात आले आहे, तसेच राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ प्रकल्पातील वाटप झालेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया,सोयाबीन टोकण व पट्टा पद्धतीने लागवड,बेडवर, डीबलर नी लागवड प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]