जनकापूर येथे कर्तबगार महिलांचा सत्कार
तळोधी (बा.) राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंती दिनी सामाजीक महिला कार्यकर्त्या देवता सुरेश सुर्यवंशी व रशीका गायधने यांचा जनकापूर ग्रामपंचायतीचे वतीने सत्कार करण्यात आला.
    महिला व बालकल्याण विभागाचे वतिने यावर्षी गावस्तरावर महिला बचतगटांसठी व मुलामुलींसाठी कार्य करणाऱ्या गावांतील दोन कर्तबगार महिलांचा "राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" हा पुरस्कार देऊन गौरविण्याचा संकल्प शासन स्तरावर राबविण्यात आला. या उपक्रमात अंतर्गत नागभिड तालुक्यातील जनकापूर येथिल देवता सुरेश सुर्यवंशी व रशीका गायधने यांचा टाफी, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पाचशे रुपये रोख देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच वेशाली गायधने, ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच महेश रामटेके, ग्रामसेवक रतन वासे, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी मसराम,आपरेटर ज्ञानेश्वर पडोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन वासे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]