विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव ( बु .) यांच्या वतीने उपसंचालक उल्हास नरड यांचा सत्कार...वरोरा.. जगदीश पेंदाम
         
तालुक्यातील जवळच असलेल्या शेगांव ( बु )या गावचे सुपुत्र उल्हास नरड यांची विभागीय कार्यालय, नागपूर येथे शिक्षण उपसंचालक या उच्चपदावर नियुक्ती झाल्याबद्दल  विकास ग्रुप व कवितेचे घर, शेगांव (बु ) यांच्या वतीने सन्मानपत्र, शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी त्यांची पत्नी कीर्ती नरड यांच्यासोबत त्यांचा  सपत्निक सत्कार करण्यात आला आहे...
      याप्रसंगी विकास ग्रुपचे समन्वयक व कवितेच्या घराचे संकल्पनाकार किशोर पेटकर, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, विकास ग्रुपचे सदस्य प्राचार्य प्रवीण वरघणे, प्रा. भालचंद्र लोडे, डॉ. दीपक लोणकर, देवाळा बुजचे मुख्याध्यापक शंकर आत्राम, प्रा. अंजली वरघणे,  नागपूर येथील निवृत प्राचार्य श्रावण सूरंशे प्रामुख्याने उपस्थित होते..
     सत्कार प्रसंगी  बोलताना प्राचार्य प्रवीण वरघणे म्हणाले, आमच्या बालपणच्या मित्राने विभागीय कार्यालय, नागपूर येथे शिक्षण उपसंचालक म्हणून पदभार सांभाळलेला आहे. शेगांवचे सुपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. त्यांनी असेच यशाचे शिखर गाठावे. उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती व्हावी अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी  विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव ( बु ) यांच्या वतीने व्यक्त केली,किशोर पेटकर म्हणाले, आम्ही एका कर्तव्यतत्पर अशा अधिकाऱ्यांचा सन्मान करीत आहोत. सतत कार्यकुशल असणे हे त्यांचे वैशिष्टय आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे हा त्यांचा गुणधर्म आहे. त्यांची नियुक्ती  ही शेगांवचा
मोठा सन्मानच होय असेही ते म्हणाले. प्रा. प्रमोद नारायणे म्हणाले,शिक्षणक्षेत्राची अत्युत्तम जाण असलेला एक कार्यकुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. कोणतेही काम करीत असताना आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न स्वीकारणारा अधिकारी असा त्यांचा परिचय आहे. त्यांचा सत्कार म्हणजे  शिक्षणक्षेत्रातील महान अशा  शिक्षणकार्याचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी नरड यांच्या मानपत्राचे वाचन केले..
यावेळी सत्काराला उत्तर देताना उल्हास नरड म्हणाले, लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. उच्च शिक्षणापर्यंत प्रथम श्रेणीतून प्रथम येण्याचा ध्यास मी सोडला नाही.
 एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गडचिरोली येथे जिल्हा परिषदमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली माझ्या मनाने प्रशासकीय सेवेचा नेहमीच ध्यास घेतलेला होता. कामात सातत्य असेल आणि मनात जिद्द असेल तर यश नक्कीच मिळेल असे सांगून सत्काराबद्दल त्यांनी शेगांव (  बु ) गावाचे आभार मानले.संचालन प्रा. भालचंद्र लोडे यांनी तर आभार डॉ. दीपक लोणकर यांनी केले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]