वरोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतचे निवडणूक आरक्षण जाहीर...
वरोरा... जगदीश पेदाम

सन 2023 मध्ये कार्यकाळ  झालेल्या दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण तहसीलदार वरोरा कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले असून लवकरच ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार आहे...
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम ही 7 सदस्य असलेले ग्रामपंचायत असून  ग्रामपंचायत सालोरी येथे 9 सदस्य ग्रामपंचायत असून दोन्ही ग्रामपंचायत ठिकाणी आरक्षण सोडत सरपंच पदासाठी जनतेमधून निवडून देणे आहे....
ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण स्त्री,, प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री, याप्रमाणे असणार असून सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती स्त्री चे आरक्षण सोडण्यात आलेली आहे,
ग्रामपंचायत सालोरी येथे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती ,अनुसूचित जाती याप्रमाणे असून सरपंच पदाकरिता सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण सोडण्यात आलेले आहे. याकरिता प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याच्या कालावधी 27 जून ते 3 जुलै पर्यंत आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]