मूल येथील प्रसिद्ध स्त्रीशक्ती ग्रुप मधील सदस्य करते आहे दारू मुक्ती साठी महिलांचे प्रबोधन
मूल:- कुमुदिनी भोयर

मूल येथील प्रसिद्ध स्त्रीशक्ती ग्रुप मधील सदस्य प्रा. डॉ. किरण किशोर कापगते करते आहे दारू मुक्ती साठी महिलांचे प्रबोधन समाजात वाढलेली व्यसनाधीनता व त्यांचे उद्भवणारे गंभीर परिणाम यांनी महिला वर्ग चांगलेच वैतागले आहेत. यात मूल तालुक्यातील चिखली देखील गाव सुटलेले नाही. गावात अवैध्य दारू विक्री जुगार आदींसह इतरही व्यवसायाच्या आजारी गावातील आबाल वृद्धांसह तरुण पिढी गेल्याने महिलांपुढे चिंता वाढली आहे. त्यामुळे गावात चालणारे अवैध धंदे गावातून हद्दपार करण्यासाठी महिलांनी कंबर कसली असून अवैध दारू विक्रीमुळे कुटुंब दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबात वैवाहिक कलह निर्माण होऊन संसार उघड्यावर येत आहेत. गाव अधोगतिकडे जाण्याचे मूळ कारण व्यसन ठरत असल्याने गावातून दारू हद्दपार करण्याकरिता महिलांनी वजमूठ बांधली असून त्यांचे प्रबोधनातून मनोबल वाढविण्याचे काम किरण किशोर कापगते करीत आहेत. यावेळी चिखली येथील प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन म्हणून या किरण कापगते तर सरपंच दुर्वास कळस्कर, पोलीस पाटील पूनम मडावी, तंटामुक्त समिती अध्यक्ष भगवान कडस्कर आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]