चिमूर शहरातील तिसरा डोळा बंद असल्याने चोरटे मोकाट

बस डेपो मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला तालुका म्हणजेच चिमूर तालुका आहे. या तालुक्याची ओळख म्हणजे भारत स्वतंत्र होण्याअगोदर चिमूर या गावाला स्वातंत्र्य मिळाले तसेच राजकीय दृष्ट्या सुद्धा चिमूर तालुका प्रसिद्ध आहे.प्रफुल पटेल , विजय वडेट्टीवार , यांसारखे दिग्गज नेते याच भूमीतून मोठे झाले.आज त्यांची भारतात मोठी ओळख आहे. तसेच चिमूर ला जिल्ह्याची मागणी आहे. उप जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा सुरू झाले आहे.व पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे.चंद्रपूर जिल्ह्याला कोरोना काळामध्ये लाभलेले पोलीस अधिक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हा हा क्राईम मुक्त व्हावा यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये CCTV कॅमेरे लावली परंतु या कॅमेऱ्याची देखरेख स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी करायला हवी परंतु याकडे दुर्लक्ष करून चोरट्याचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणावर चिमूर शहरात सुरू आहे. अनेक प्रकरणे निकाली न काढता प्रलंबित आहेत. दैनंदिन चिमूर बस्थानक याठिकाणी चोरी होत असून अजूनही एकही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला नसून पोलीस प्रशासनावर व त्यांच्या  कर्तव्यावर ? चिन्ह उद्भवले जात असून जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चोरट्यांची टोळी अजूनही मोकाट फिरत असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक्षक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]