शेतकऱ्याचे सोलर पॅनल चोरट्यांनी केले लंपासतळोधी (बा.) -. 
नागभीड तालुक्यामधील गंगासागर हेटी येथील रहिवाशी यादव गणोजी बोरकर यांची शेती मौजा  उश्राल रीट येथे असून गट नंबर 84 आहे , उश्राल मेंढा रोड ला लागून असून, यामध्ये सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंप शेती सिंचनाकरिता बसविण्यात आला आहे ,परंतु चोरट्यांनी त्या सोलर पॅनल मधील एक पॅनल,दोर व केबल चोरी केला, आता येन पावसाळ्याच्या सुरुवातीला पॅनल, दोर व केबल चोरून नेल्यामुळे शेतीला पाणी कसे द्यावे व सिंचन कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आलेला आहे,आणि आता सिंचन सुद्धा करता येत नाही यामुळे पंप असून सुद्धा शेती पिकविता येणार नाही, यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, या प्रकरणाची तक्रार सुद्धा १९/०६/२०२३ ला पोलीस स्टेशन ला दिली आहे ,  गावाजवळ अनेक शेतकऱ्यांचे सोलर पंप लागलेले आहेत आणि असेच जर चोरट्यांनी पॅनल चोरी केले तर शेतकऱ्यांना शेतीला सिंचन करणे अडथळ्याचे होणार आहे, या चोरट्यांची रहदारीही गावानजीकच असल्याचा संशय सुद्धा लोक व्यक्त करीत आहेत.
यामुळे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे सर्व शेतकऱ्यांचे मनने आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]