तब्बल 22 तासानंतर मिळाले घोडझरी तलावात बुडालेल्या चार युवकांचा मृतदेह...शेगाव परिसरात दुःखाचे वातावरण...


वरोरा.. जगदीश पेंदाम

नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात रविवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान चार युवक तलावात मोबाईलवर सेल्फी काढत असतांनाच एक युवक पाय घसरून पडला, त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी तिन मित्रांनी तलावात उडी घेतली. त्यात या चारही युवकांचा बुडुन मृत्यू झाल्याची व्हदयदाय घटना घडली.क्षणात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.नागभीड पोलीसांना याघटनेची माहिती देण्यात आली...
पोलिस घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम करण्यात आली असता सायंकाळ झाल्याने त्यांच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागला नाही जिल्हा अधिकारी यांना या घटनेची माहिती देण्यात आली त्यांनी लगेच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण चमुला रविवारलाच रात्री घोडाझरी येथे पाठविले असता चमुने सोमवारी सकाळी ६ वाजता पासून आपली
शोध मोहीम सुरू केली तब्बल 22 तासांनी संकेत प्रशांत मोडक (२२)  चेतन  मांदाळे (१७) धीरज झाडे(२७)  मनिष  श्रीरामे (३०) त्यांचे मृतदेह सापडले असून चारही मृतदेह नागभीड येथिल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले व त्यांनचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले,नागभीड पोलिस यांनी अखेर सर्व युवकांचे मृतदेह मिळविण्यात करिता अथक परिश्रम घेऊन मृतदेह प्राप्त केले.. सर्व माहिती शेगाव वासियांना मिळताच गावात तसेच परिसरात हंबरडा सुरू असून गावात सर्वत्र शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यांच्या मृतदेहावर शेगाव येथील स्मशान भूमीत येथे रात्री अंतिम संस्कार करण्यात येईल.....'स्वाब' नेचर केअर संस्थांचे   अध्यक्ष यश कायरकर, सदस्य जिवेश सयाम,नितीन भेंडाळे, शुभम सूरपाम, गणेश गुरनुले
शुभम निकेसर, छत्रपती रामटेके,विनोद लेनगुरे, वेदप्रकाश मेश्राम , प्रशांत सहारे , निखिल रामटेके, सोबत वाढोणा येथील आठ मच्छीमार यांनी या रेस्क्यु मध्ये कालपासून शेवटचे शव मिळेपर्यंत सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]