चांदली बुज् येथे लांडग्याच्या हल्यात 5 मेंढया ठार - मेंढपाळाचे हजारोचे नुकसान

चांदली बुज् येथे लांडग्याच्या हल्यात 5 मेंढया ठार -  मेंढपाळाचे हजारोचे नुकसान
सावली प्रतिनिधी -  चांदली बुज शेतशिवारात लांडगे दिवसा ढवळ्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ले करून ठार मारत असल्याने मेंढपाळ भयभीत झाले आहेत. मलाजी करेवार यांच्या 5 मेंढ्यांना ठार केले असून महिन्याभरात अनेक शेळ्या मेंढ्यांना ठार केले आहे.
   सावली तालुक्यातील चांदली बुज येथील शेटशिवारात लांडग्याचे कळप थैमान घालत असून आजपर्यंत अनेक शेळ्या मेंढ्यांना ठार केले आहे. आज दुपारच्या दरम्यान चांदली बुज. शेतशिवारात 4-5 लांडग्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून मलाजी करेवार यांच्या 5 मेंढ्यांना ठार केले त्यामुळे त्यांचे 40 हजाराचे नुकसान झाले आहे. अशा महिन्याभरात अनेक घटना घडल्यामुळे मेंढपाळ आर्थिक संकटासोबत भयभीत झाले आहेत. निरक्षर मेंढपाळाला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळते हे माहित नसल्याने त्यांनी वनविभागाला कळविलेले नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान भरपाईपासून वंचीत राहण्याची पाळी आली आहे. मेंढपाळाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याने लांडग्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेंढपाळाकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]