मी अनुभवलेले वि.तु. नागपुरेजीदलितमित्र वि.तु.नागपूरेजी राजकारणा व्यतिरिक्त या भागातील एक शेतीनिष्ठ शेतकरी,अभ्यासू लेखक, विविध कलांची आवड असणारे प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते.विशेषत:त्यांना संगीताची आवड होती.बी.ए.ला त्यांना संस्कृत हा विषय असल्याने संस्कृत या विषयाचा अभ्यास होता.राष्ट्संताचे 'हर देशमे तू---हेभजन, सुधीर फडके यांचे'कुठे शोधीशी रामेश्वर ___हे व सुरेश वाडकर यांचे 'कोटी कोटी रुपे तुझी __ही भक्ती गीते त्यांना प्रीय होती.त्यातील काही गीते त्यांनी मला लिहून मागीतली.शाळेत बसविलेले स्वागत गीत असो की समुह गीत असो,सादर करण्यापूर्वी ते तालीम ‌प्रत्यक्ष पाहत असतं.एक प्रसंग नमूद करतो.मी शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर ३__४वर्षाने मला B.Ed.करणे भाग होते.व शासनाकडून वेतनावर B.Edकरण्याची ही शेवटची संधी होती.त्यांनी त्या वेळी जनता महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.झा.यांना फोन करून व पत्र देऊन माझा प्रवेश निश्चित केला.त्यावेळी मला महाराष्ट्र ब्यांकेत मूल येथे नोकरी ची नेमणूक झाली.मी नोकरीचा राजीनामा दिला.व त्यांना ही गोष्ट सांगितली.त्यावेळी त्यांनी मला हा व्यवसाय सोडू नका , तुमच्या सारखे लोक शिक्षकी व्यवसायात गरजेचे आहे.तुम्हाला काही त्रास आहे काय,असे विचारले.त्यावेळी दे.लोकसते तील कै.आगरकर व के.गोपाळ कृष्ण गोखले यांच्या वर आलेले लेख वाचावयास दिले.व मला राजीनामा मागे घ्यावयास लावला.आयुष्याच्या उतारवयात हळूहळू त्यांच्या लक्षात आले की माडीवर येणारी काही माणसे मतलबी आहे.ते मला ३_४दिवसानंतर नेहमी बोलावीत.काम काहीच नसे.कौटूंबिक ,शेती विषयी, व त्यांना ज्यांनी बनारसलाशिक्षणासाठी प्रवृत्त केले त्या अणे कुटुंबाविषयी ते विचारत.त्याना ज्यांनी जी जी मदत केली, त्यांचें विषयी कायम कृतज्ञ राहणं हा भाव त्यांच्या जीवनाचा भाग होता.राजकारणात राहूनही ही मुल्ये त्यांनी कायम जपली.त्यांच्या स्मृती ला‌ विनम्र प्रणाम.
लेखक
शशीकांत धर्माधिकारी
सेवानिवृत्त प्राचार्य
नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय
मूल जिल्हा चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]