पोलीस विभाग व पत्रकार संघ, स्वाब संस्था, तळोधी बा. यांच्या संयुक्ताने वृक्षारोपण.

तळोधी बा: 
            
            महाराष्ट्र कुषी दिन निमित्ताने तळोधी बा. पोलीस स्टेशन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तळोधी बा. यांच्या संकल्पनेतून तळोधी बा. नव्याने निर्माणाधिन पोलीस स्टेशन च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन गुलमोहर, निंब, जांभूळ, वड, वृक्ष अशे जवळपास शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. 
            यावेळी तळोधी बा. पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर, पी. एस. आय. भास्कर पिसे, वाहतूक पोलीस संजय मांढरे,  तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने संघाचे अध्यक्ष संजय अगडे, सचिव मोनिल देशमुख, पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष महेश काशीवार,भारत चुनारकर, पत्रकार नन्नावार सर, राहुल रामटेके,

      स्वाब नेचर केअर संस्था चे अध्यक्ष व पत्रकार यशंवत कायरकर, ग्रामपंचायत सदस्य जिवेश सयाम, व स्वाब नेचर केअर संस्था चे सदस्य छत्रपती रामटेके ,विनोद लेनगुरे ,सूरज भाकरे , आकाश मेश्राम ,नितीन भेंडाळे, शुभम सूरपाम, गणेश गुरूनुले, शुभम निकेसर , विशाल बारसागडे, पुंडलिक नागोसे ,रामचंद्र  पंधराम, हे सदस्य गण, पोलीस कर्मचारी व पत्रकार बंधू यावेळी मोठ्या संख्येने सकाळी ९ वाजता पासून ते दुपारी १२;३० पर्यंत उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]