आपुलकी फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक साहित्य वितरण..!!
• जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या 200 मुलांना साहित्य वितरण  

नागभीड: गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक,संस्कृतिक,समाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपुलकी फाउंडेशन नागभीड च्या वतीने यावर्षी रुख्मिणी सभागृह नागभीड येथे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, बुक्स, व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले...!!
     क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्ममाला अर्पण करीत तसेच आपुलकी चे दिवंगत संचालक मनोज कोहाट यांना श्रद्धाजंली अर्पण करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली..!!
   कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री व माजी जि. प.सदस्य संजय गजपुरे,नागभीड व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धमानी,नागभीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ,प्रा.डॉ.मोहन जगनाडे सर,पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम पाथोडे, गोंडवाना विद्यापीठ खरेदी समिती सदस्य अजयजी काबरा,प्राचार्य देविदास चिलबुले,चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, शिवसेना (शिंदे) तालुका प्रमुख मनोज लडके,काँग्रेस शहर प्रमुख रमेश ठाकरे, माजी सरपंच जहांगीर कुरेशी, समाजिक कार्यकर्ते श्रीकृष्णा देव्हारी, आपुलकी चे अध्यक्ष विजय बंडावार यांची उपस्थिती होती..!!
       सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा कोरंबी, तुकूम,तिव्हर्ला,भिकेश्वर,डोंगरगाव,चिखल परसोडी, नागभीड येथील जि.प.कन्या शाळा,जि. शाळा शिवनगर, जि.प. शाळा सुलेझरी, जि.प. बेसिक शाळा,सरस्वती ज्ञान मंदिर इत्यादी शाळेतील इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्वाना बॅग व इतर शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले.. यावेळी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त करताना आपुलकी फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या... यावेळी आपुलकी चे  संचालक महेश ठाकरे यांचा जन्मदिवस मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील नवघडे यांनी केले प्रास्ताविक पराग भानारकर यांनी तर आभार सतीश जिवतोडे यांनी मानले..!!
   सदर कार्यक्रमाला नंदा दुरबुळे मॅडम,शेखर फटिंग,दीप्ती मडावी,गीता जककनवार यांचे विशेष सहकार्य लाभले..  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपुलकीचे संचालिका माया सहारे मॅडम,शीतल दिघाडे, संचालक विजय बंडावार, मधू भाऊ डोईजड, राजू ठाकरे, सचिन वाकुडकर, नरेश ठाकरे, महेश ठाकरे,स्वप्निल नवघडे,डॉ. पवन नागरे, पराग भानारकर,सतीश जिवतोडे, प्रकाश जांभुळे, मुकेश लांजेवार इत्यादींनी प्रयत्न केले..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]