रानटी डुकराच्या हमला महिला गंभीर जखमी, डुकराने तोडले कान.
तळोधी (बा.)
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बीटातील वाढोणा येथील महिला 'सायञा  मारोती सयाम' वय 55, ही आपल्या घरासमोरील जागेवर सायंकाळी घरकाम करीत असताना अचानक रानटी डुकराने हमला करून तिला गंभीर जखमी केले .  ती पडल्यानंतर तिच्या कान कुर्तडुन डावा कान तोडला, यात तिला छातीला, डोक्याला, व डाव्या पायाला गंभीर दुखापती झाल्या. तिने आरडाओरड करताच लोकांनी बीच बचाव करून त्याला रानटी डुकराला हाकलून लावले.  त्यानंतर तिला जखमी अवस्थेत वाढोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्राथमिक उपचार करून तिला समोरील उपचारा करीता सिंदेवाही ला पाठविले.     
       घटनेची माहिती मिळतात आलेवाही बीटाचे वनरक्षक श्री पंडित मेकेवार यांनी घटनास्थळी जाऊन मोका पंचनामा केला. व परिसर स्वच्छ ठेवा जेणेकरून घरापर्यंत रानटी डुकरे येनार नाहीत या बद्दल बद्दल सूचना केल्या. व वन विभागामार्फत उपचाराकरिता लागणारी संपूर्ण रक्कम देऊन मदत केली जाईल असेही सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]