प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी साधला विद्यार्थ्यीनीशी संवादमहाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी विचारवंत लेखक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी आज नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यीनीशी  संवाद साधला.
"ज्ञान लाभो शील लाभो धैर्य लाभावे मना" ही प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर यांची प्रार्थना, "घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दाऊ नका" ही शेतकरी आत्महत्या वर लिहिलेले गीत आणि त्यांचा मतितार्थ प्राध्यापक वाकुडकर यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितला. ज्याप्रमाणे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याग करून देश घडविला त्याच धर्तीवर आपल्यालाही त्याग करून देशाची सेवा केली पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.
प्राध्यापक वाकुडकर यांनी व्यस्ततेतून वेळ काढून ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थिनी सोबत संवाद साधला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांचे मार्गदर्शनात ज्येष्ठ शिक्षक विजय सिद्धावार यांनी हा संवाद घडवून आणला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]