ग्रामपंचातच्या हलगर्जी पणामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात.... 

वरोरा..जगदीश पेंदाम

तालुक्यातील जवळच येत असलेल्या दादापूर, धानोली गट ग्रामपंचायतच्या हलगर्जी पनाचा फटका पुन्हा एकदा ऐन पावसाच्या दिवसात गावकऱ्यांना भोगावा लागत असुन ग्रामपंचायत ने केलेल्या चुकीच्या कामामुळे संपूर्ण दादापूर ग्रामवासियांच्या दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आलेले आहे....
 सात सदस्य असलेली गट ग्रामपंचायत दादापूर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील एकच विहीर असल्याने नागरिक वापर करत असतात त्यामुळे पावसाळ्यातील पाणी विहिरीत जात असल्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत असल्यामुळे संपूर्ण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असुन या ठिकाणी काही महिन्या आधी ग्रामपंचायत इमारत बांधकामा करीता त्याच विहारी लगत ग्रामपंचायत ने मोठं, मोठे खड्डे काही दिवसांपूर्वी खोदण्यात आले होते गावकऱ्यांनी या बांधकामाला  विरोध केल्यानंतर हे खड्डे तात्पुरते बुजवण्यात आले परंतु त्यात कुठल्याही प्रकारचे पक्के काम न केल्याने त्यात पावसाळ्याचे तसेच गावातील पाऊसाचे पाणी जमा होऊन पाणी त्या खड्यांच्या साहाय्याने एकमेव असलेल्या  पिण्याच्या पाण्याच्या विहरीत जात असल्याने दादापूर ग्रामवासियांच्या आरोग्या धोक्यात आले आहे,याबाबत गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतला पावसाळ्याचे पाणी विहिरीत जात असून पिण्याच्या पाणी खराब होत असल्याचे वारंवार सांगून सुद्धा ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकाकडून करण्यात आलेला आहे....


@ मी एक ग्रामपंचायत सदस्य असून मी सुद्धा सरपंच मॅडम यांना या बदल माहिति देण्या साठी फोन केला असता त्या माझा पण फोन उचलत नाही तसेच गावातील समस्याकडे लक्ष देत नाही   :- दिलीप बोधाने  ग्रामपंचायत सदस्य  दादापूर

@ याबाबत ग्रामपंचायत शिपायांना सांगितला आहे व त्यांना विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकायला सूचना दिली आहे.. सरपंच विद्या खाडे गट ग्रामपंचायत दादापुर,धानोली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]