क्रिस्टल कॉंन्वेंटच्या वतीने वसुंधरा दिन साजरामूल शहरातील नामांकित क्रिस्टल कॉन्व्हेंट येथे जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. 
जागतिक वसुंधरा दिनाचे निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. ही रॅली काॅन्वेट ते गांधी चौक अशी काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थी वृक्ष लावा वसुंधरा वाचवा असे घोषणा देत होते.
आज दिनांक 07/07/23 रोज शुक्रवार ला क्रिस्टल कोन्वेंट मुल तर्फे वसुंधरा दिनानिमीत्य सकाळी 11 वाजता शाळा ते गांधी चौक मार्गे विविध उपक्रमासह भव्य रॅली काढन्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन शाळेच्या अध्यक्षा   सौ. वीणा श्रीवस्तवा होते.  सुत्रसंचालन शाळेचे प्राचार्या सौ. राशी नखाते यांनी केले.  सहशिक्षीका कू. योगिता तेल्तुम्बडे, प्रिया कोटगले, शबिया पठाण यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सर्व विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनानिमीत्य उद्बोधन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]