घोडाझरी तलाव कामगारांची चार महिन्याची मजुरी तात्काळ देण्यात यावी. दादाजी सहारे यांची मागणी
 तळोधी बा. :- 

घोडाझरी तलाव उन्हाळी धान पीक सन 2023 करिता हंगामी मजूर कामगारांना पाणी वाटप करण्यासाठी दहा ते बारा मजूर कामाला लावले होते परंतु जानेवारी ते एप्रिल  कामाचा कालावधी या चार महिन्याची मजुरी अजून पर्यंत मिळाली नाही त्यामुळे फक्त मजुरीवर आपल्या संसाराचा गाळा चालविणाऱ्या मजुरांचे  आर्थिक  बेहाल होत आहेत त्यामुळे चार महिन्याची मजुरी तात्काळ संबंधित प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराकडून  देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे प्रमुख दादाजी सहारे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव अंतर्गत उन्हाळी फसल मोठ्या प्रमाणात घेतली जात असते त्यात प्रशासनाने सर्वच कामे ठेकेदारी पद्धती अवलंबल्यामुळे ही पण कामे तलाव प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदारा मार्फत पाणी वाटप केल्या जाते अशाच प्रकारे या तलावांतर्गत जानेवारी ते एप्रिल दरम्यान  पाणी वाटप करण्याकरता जवळपास दहा ते बारा हंगामी मजूर लावण्यात आले होते परंतु त्या हंगामी  मजुरांची चार महिन्याची मजुरी अजून पर्यंत देण्यात आलेली नाही हल्ली जुलै महिना सुरुवात होत आहे तरीपण त्या मजुरांना संबंधित ठेकेदार व प्रशासन मजुरीसाठी हुलकावणी देत आहे. या संबंधात  अधिकाऱ्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  प्रत्यक्ष चर्चा  केली असता चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता श्री मा. काळे साहेब म्हणतात की तुम्ही जुनून कर साहेबांना विचारा जुनूनकर साहेब म्हणतात की मी ठेकेदारांना सांगतो परंतु जुनूनकर साहेबांना ठेकेदार कोण आहेत तेच माहीत नाही .या  यानिमित्ताने ठेकेदार जुनूनकर साहेबच आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे अधिकाऱ्यांना गरीब कामगारांचे हाल अपेष्टा सहन करावे  लागत आहेत त्यांचे कुटुंब उपासमारीच्या संकटात सापडले आहेत याची जाणीव अधिकाऱ्यांना का होत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
यानिमित्ताने घोडाझरी प्रशासनाचे उपअभियंता  जुनूनकर साहेब यांनी स्वतः कामगारांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन चार महिन्याची कामगारांची मजुरी तात्काळ देण्यासाठी उपाययोजना करावे अन्यथा येत्या पंधरा दिवसात कामगारांची मजुरी न मिळाल्यास उपोषण करण्याचे ठरविले आहे अशी माहिती पाटबंधारे घोडाझरी कामगार संघटना प्रमुख यांनी संबंधित प्रतिनिधीला प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]