सावली तालुक्यात मुद्रांक विक्रेत्यांचा तुटवडा - स्टॅम्प पेपरसाठी नागरिकांची भटकंती

सावली तालुक्यात मुद्रांक विक्रेत्यांचा तुटवडा - स्टॅम्प पेपरसाठी नागरिकांची भटकंती
सावली -  मागील काही दिवसांपासून  सावलीतील नागरिकांना स्टॅम्प पेपरसाठी मुल, गडचिरोली येथे भटकंती करावी लागत आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुद्रांक विक्रेते वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
   प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्र, करारनामा, खरेदी विक्री आदी शासकीय कामकाजांसाठी कोर्ट फी तिकिट, स्टॅम्प पेपरची नागरिकांना आवश्यकता असते. परंतु मागील काही दिवसांपासून नागरिकांना मुद्रांकासाठी चांगलीच धावपळ करावी लागत आहे. सावली तालुका हा लोकसंख्या व भुभागाच्या प्रमाणात फार मोठा असून 54 ग्रामपंचायत आहेत मात्र  फक्त एकच मुद्रांक विक्रेता असल्याने तालुक्यातील नागरिकांना नेहमी आगाऊ पैसे देऊन विकत घ्यावा लागतो. 500 रुपयाचे स्टॅम्प मुल व गडचिरोली येथून आणावे लागतात. सद्या विद्यार्थ्यांना जातीचे व इतर दाखले करिता, शेतकऱ्यांना कर्ज व इतर कामासाठी, महिला बचत गटाना कर्जासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता आहे. मात्र येथील स्टॅम्प विक्रेता उपचारासाठी मागील काही दिवसापासून दवाखान्यात भरती असल्याने व इतर परवानाधारक मुद्रांक विक्रेता नसल्याने सावली तालुक्यात नागरिकांना स्टॅम्पपेपरसाठी भटकंती करावी लागत असून मुल , गडचिरोली येथून स्टॅम्प पेपर आणून आपली कामे करावी लागत आहेत परिणामी वेळ व जास्तीचा पैसा खर्च करावा लागत आहे. 
 नवीन मुद्रांक विक्रेता परवान्याची गरज
    पूर्वी दोन मुद्रांक विक्रेते होते परंतु त्याचा मृत्यू झाल्याने त्याची पत्नी कविता यादव मोहुर्ले हिने दोन वर्षांपासून मुद्रांक विक्रेता परवाना मिळण्यासाठी जिल्हा निबंधक चंद्रपूर यांचेकडे प्रस्ताव दिला आहे मात्र हा प्रस्ताव धुळखात पडलेला आहे. याकडे  प्रशासनाने लक्ष्य देऊन परवाना द्यावा त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]