ग्राम सभेचा ठराव नसताना जांभुळघाट येथे बार अँड रेस्टॉरंट सुरू

ग्रामसभे च्या ठरावाला केराची टोपली

बार ला परवांगी देऊ नये असा ग्रामसेभेत सर्वानुमते ठराव मंजूर

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - मौजा जांभुळघाट येथे अखेर एक बार सुरू तर दुसरा बार काही दिवसात सुरू होणार ? गाव वासियांचा बार ला तिव्र विरोध असताना शुध्दा बार मालकाने आपला बार अखेर सुरू केला. पैशापुढे गाव सुध्दा काहीच करू शकत नाही, याचे कारणही तीतकेच आहे.गावातील सरपंचाला व सदस्याना राजकीय किंवा इतर अनुभव कमी असल्याने आज जांभुळघाट येथे या परीस्थीला सामोर जावे लागत आहे. ज्या वेळी गावकऱ्याना बार बद्दल माहीती पडली त्या वेळी  ग्राम सभा बोलावण्यात आली.त्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता कि जांभुळघाट येथे बार व दारू च्या दुकानाला परवांगी देण्यात येऊ नये.अश्या प्रकारचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला होता.पण या ठरावाला वरीष्ठ अधिकाऱ्यानी केराची टोपली दाखवत अखेर बार मालकाला बारची परवानगी देण्यात आली. ग्राम सभेच्या ठरावाची प्रत वरीष्ठ अधिकाऱ्याना पाठवण्यात आली असता बार ला परवांगी दिली तरी कसी अश्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे. बनावट तर कागत पत्रे जोडले तर नाही ना ? अश्या प्रकारची चर्चा गावात नागरीका कडून होत आहे.या सर्व प्रकारची वरीष्ठ अधिकारी यांचेकडून चौकसी करून परवानगी रद्द करण्यात यावी अशी जांभुळघाट वासीया कडूण मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]