सुशी ग्राम पंचायत करीत आहे निकृष्ठ दर्जाचे कामएकाच महिण्यात सि सी रस्ता उखळला: सरपंच, सचिवावर कारवाईची मागणी

सुशी दाबगांव (प्रतिनिधी): गावाच्या विकास कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत मूल तालुक्यातील सुशी ग्राम पंचायतला लाखो रूपयाचा निधी आला, मात्र सदर निधीमधुन अतिशय निकृष्इ दर्जाचे काम सुरू असुन एकाच महिण्यात सिमेंट क्रॉक्रिट रस्ता उखळल्याने ग्राम पंचायत प्रशासनाप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात असुन सरपंच, सचिवावर कारवाई करण्याची मागणी नागरीाकांनी केली आहे.
मूल तालुक्यातील मौजा सुशी ग्राम पंचायत मार्फत लाखो रूपयाचे ग्राम कामे स्वतः ग्राम पंचायत करीत आहे, गावाच्या विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडुन ग्राम पंचायतला विकास निधी दिलेला आहे, सदर निधी मधुन ग्राम पंचायतने दर्जेदार काम करणे अपेक्षीत आहे, मात्र सरपंच, सचिवांनी आर्थीक लाभासाठी अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम करीत आहे, गेल्या महिण्यात रायभान वाढई ते देउलमले यांच्या घरापर्यंत लाखो रूपये खर्च करून सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे केल्याने एक महिणा पुर्ण होण्यापुर्वीचे रस्त्याची एैसीतैसी झाली असुन अनेक ठिकाणी रस्ता उखळलेला आहे. गावाच्या विकासासाठी नागरीकांनी सरपंच, पदाधिकारी, सदस्यांना निवडुण दिले मात्र लवकरच लखपती बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी गावातील कामे निकृष्इ दर्जाचे करीत असल्याने नागरीकांनी रोष व्यक्त करीत आहे.
ग्राम पंचायतच्या मार्फतीने चरण बुरांडे ते देउरमले यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असुन सदर काम करीत असताना रवाळी सोलीग करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम न करताच सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम करण्यात आले आहे, यामुळे सदरही रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले आहे, निकृष्ठ दर्जाचे काम करणाÚया सरपंच, सचिवांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]