मुल अभाविप तर्फे सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुल च्या वतीने मुल शहरातील सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जात पालकांसंमवेत सत्कार करण्यात आला, शहरातील शुभम सुधाकर डांगे यांचा चिरंजीव हिस्टरी, ओंकार सुभाष चनावार हा mathematics विषयात तर कु रागिणी गणेश उमलवार ही झूलॉजि या विषयात सेट परीक्षा पास झालेली आहे, यातील शुभम डांगे व ओंकार चनावार याचे वडील शिक्षक आहेत, कु रागिणी चे वडील हे शहरात चहा विक्री करत आपली उपजीविका करतात , तिन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला, प्रा  डॉ सौ किरण कापगते, प्रा डॉ खुशाल राठोड ,प्रविनजी मोहूरले, मा मुख्या. सुखदेव चौथाले, प्रज्योत रामटेके, प्रदून्य कंदिकुरवार, प्रा शेंडे, गणेश कावळे, कुणाल शेंडे, यश रामटेके, बालू कोमलवार, पियुष कवाडकर, प्रदीपजी करकाड़े व इतर अभाविप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]