पट्टेदार वाघाने गोऱ्यास व गुराखीला केले ठार

चिमूर तालुक्यातील डोमा येथील घटना

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील डोमा येथील गुराखी डोमडू रामाजी सोनवाने अंदाजे वय ६५ वर्षे असून हा १४ जुलै २०२३ ला नेहमीप्रमाणे कंपार्टमेंट नंबर ४७४ येथे गावातील जनावरे घेऊन चराईसाठी गेला होता.अचानकपणे पट्टेदार वाघाने गोऱ्यावर झडप घातली व गोऱ्याला वाचविण्याच्या नादात गुराख्यावर सुद्धा वाघाने हल्ला चढवून ठार केले.सायंकाळी जनावरे घरी पोहचली परंतु गुराखी घरी न आल्याने घरच्या व गावातील लोकांनी मिळून जंगलात शोधा - शोध केली परंतु रात्र झाली. असल्याने गुराखी सापडला नाही. परत दुसऱ्या दिवशी १५ जुलै ला शोधमोहीम सुरू केली असता डोमडू सोनवाने यांचा मृतदेह आढळून आला.व काही अंतरावर गोरा सुद्धा मृत वाघाने खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत ची माहिती विनविभागास गावकऱ्यांनी दिली असता वनविभागाने घटनास्थळ गाठून मृतक इसमाचे शव शव - विच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेले तर तात्काळ मृतकाच्या नातेवाईक यांना २५००० रुपयांची मदत वनविभागाने केली.हि घटना पहिली नसून वारंवार वाघाचे हल्ले चंद्रपूर जिल्ह्यात तसेच चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकरी तसेच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]