गोसेखुर्दच्या निर्मानधिन उजव्या कालव्याची पाळ फुटल्याने तिन एकर शेत भुईसपाट

तळोधी(बा.)  नागभिड तालुक्यातील सावंगी (बडगे)  परिसरातून गेलेल्या गोसेखुर्द उजव्या कालव्याची निर्मानधिन पाळ फुटल्याने कालव्यातील साचलेले पाणी लगतच्या सावंगी शेतशिवारात शिरले. त्यामुळे काॅनल मधील पाणी शेतीच्या दिशेने वाहु लागल्याने रविंद्र बाबुराव शेंडे रा. पळसगाव (खुर्द) यांची तिन एकर शेतजमीनी मधे रेती दगड पुर्णता:  वाहुन गेल्याने  व धानपिकाचे पऱ्हे उपसामुळे जमिनदोस्त झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 
      चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारच्या रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने एकाच रात्री नदी, नाले,तलाव पुर्ण भरले तरीही संततधार पाऊस सुरूच आहे. परिनामी जलसाठ्यात वाढ झाली. नागभिड तालुक्यात निर्मानधिन असलेला गोसेखुर्द चा उजवा कालव्यांचे काम सावंगी (बडगे) या परिसरात सुरु आहे. या कालव्यांचे काम एल.बी.कुंजीर काॅन्टक्शन क़पंनी पुणे यांचे मार्फतीने सुरू आहे. हा कालवा जनकापूर ते सावंगी या परिसरातून गेला आहे. कंपनीच्या कासवगतीच्या कामामुळे व वेळीच पडलेल्या मुसळधार पावसामुळे या कालव्याची पाळ फुटल्याने या कालव्यातील पाणी लगतच्या शेतशिवारात शिरले परिणामी रविंद्र बाबुराव शेंडे यांचे गट क्रमांक ५७/१ (तिन एकर)  शेतजमीन भुईसपाट झाली आहे.     

         शेतजमीनीमधे गोसेखुर्द कॅनल मधे साचलेल पाणी निर्णनधीन कॅनलची पाळ फुटल्याने पाळीची दगड माती पाण्याच्या प्रवाहासोबत शेतात पसरल्याने शेती निकामी झाली आहे. धानपर्हे उपसामुळे जमिनदोस्त झाले आहे. गोसेखुर्द  कॅनलेचे बांधकामामुळे तिन एकर शेतीतील धानपिकापासुन वंचित राहण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.
     सदर घटनेचा तपास करून शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]