अप्पर जिल्हा कार्यालयाला विरोध; अर्ध जलसमाधी आंदोलनाची समन्वय समितीची तयारी..!!चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्य क्षेत्रात समावेशाबद्दल जनतेत प्रचंड रोष.!!
घोडाझरी तलावात तिन्ही तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष अर्ध जलसमाधी आंदोलनाची करणार..!!


नागभीड: नागभीड येथे नागभीड,ब्रम्हपूरी,सिंदेवाही येथील जिल्हा मागणी संघर्ष समितीची संयुक्त बैठक पार पडली.. यात  सिंदेवाही,ब्रम्हपुरी येथील समितीचे संयोजक यांची उपस्थिती होती. यात सर्वांनुमते चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय क्षेत्रात जनतेची कुठल्याही हरकती न घेता समावेश केल्याबद्दल सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.. तसेच सर्वांनुमते दिनांक 2 आगस्ट रोजी घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला. 2019 साली चिमूर येथे अप्पर जिल्हा.कार्यालयाची घोषणा केली तेव्हा जिल्हाधिकारी यांनी हरकती मागविल्या होत्या व त्याचा अहवाल शासनाला पाठविला होता.. मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाही करण्यात आली नाही.. त्या नंतर सरकारने ब्रम्हपुरी येथे अप्पर जिल्हा.कार्यालय स्थापन करण्याचे पत्र काढले होते मात्र पुढे त्याचे काहीच झाले नाही.. गेल्या अनेक दिवसापासून सिंदेवाही,नागभीड, ब्रह्मपुरी येथे सात्यत्याने जिल्हा मागणी   साठी आंदोलने केली जात आहेत.. मात्र असे असताना शासनाने तिन्ही तालुक्यातील जनतेचा कुठलाही विचार न करता 13 जुन रोजी अप्पर येथे अप्पर जिल्हा कार्यालय निर्मिती करण्याची घोषणा केली.. नागभीड,ब्रह्मपुरी, सिंदेवाही येथील जनतेला चिमूर हे दळण वळणाच्या दृष्टीने सोयीचे नसल्याने त्यामुळे याला विरोध म्हणून अनेक आंदोलने केली अनेक अधिकारी व पदाधिकारी यांना निवेदने दिली तरी मात्र अजून कुठल्याही प्रकारचे उत्तर आले नसल्याने व सरकारने त्याची दखल न घेतल्याने आज तिन्ही तालुक्यातील जनता ही एकवटली असून सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]