चंद्रपूरच्या प्रिती अनिल भास्करवार यांना "अवार्ड "ने सन्मानीत




प्रीती अनिल भास्करवार ह्यांना ह्या वर्षीचा 'ऑल इंडिया वूमन अचिव्हरस अवॉर्ड २०२३ मिळाला आहे. त्यांना वूमन ऑफ थे फिक्चर चा अवॉर्ड मिळाला आहे.

प्रितीला शिक्षणाचे बाळकडू लहानपणीच मिळाले. तिच्या पालकांनी तिला २ महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जगात खुप शिकण्यासारखे आहे. शिक्षण कधीही थांबवू नकोस, वेगवेगळ्या क्षेत्राचे ज्ञान मिळव आणि दुसरे जे काही शिकणार त्यात प्राविण्य मिळव. तिचा शिक्षणाचा प्रवास अर्थातच प्राविण्य मिळवत सुरु झाला. B.Sc मध्ये ७ सुवर्णपदकं आणि ५. अवॉर्डस, M.Sc मध्ये १ सुवर्णपदक तिने मिळविले.

प्रितीने शिक्षण लग्नानंतरही सुरूच ठेवले. तिला तिच्या जोडीदाराने प्रत्येक पावलावर साथ दिली. प्रत्येक वेळेला प्रोत्साहन दिले. एक वर्ष तू शिक आणि मी बाकीच्या गोष्टींची जबाबदारी घेईन, पुढल्या वर्षी मी शिकणार तू बाकीच्या गोष्टींची काळजी घे, असे त्यांनी लग्नानंतर ठरवले. त्यामुळे दोघांनाही सोपे झाले. लग्नानंतर प्रितीने इंटिरियर डिझायनिंग च्या कोर्स मधे सुवर्णपदक मिळवले, कंप्युटर कोर्सेस पण केले. त्यानंतर चाईल्ड कॉउंसेल्लिंग (लहान मुलांचे समुपदेशन) च्या कोर्स मध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर आल्या.

लहानपणा पासन प्रत्येक मुलीची सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याची इच्छा असते. प्रितीने त्या क्षेत्रात पण आपले प्राविण्य दाखवत मिसेस महाराष्ट्र २०१६ च्या स्पर्धेत आईकॉनिक आईज हा किताब वयाच्या ४१ वर्षी मिळवला.

त्यानंतर रेकी आणि प्राणिक हिलींग चे कोर्सेस केलेत. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालत, रिसर्च पेपर

लिहीलेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेत. त्यांनी आपल्या ह्या विविध क्षेत्रातील माहीतीचा समाजाला काही

फायदा व्हावा म्हणून यू ट्युब चैनल सुरू केले होते. त्यातून ध्यान, शांती, आपले सण आणि त्यामागचे वैज्ञानिक महत्व

ह्या सारखे त्यांनी वेगवेगळे विषय लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

आता प्रिती प्राणिक हिलर आणि कॉऊन्सेलर म्हणून काम करतात. त्यांचा आपण मिळवलेल्या ज्ञानाचा लोकांना कसा फायदा करून देता येईल सतत प्रयत्न असतो. त्यांना २०२२ मधे "एज्युकेशन एक्सेलेन्स अवॉर्ड मिळाला. इंटेल सारख्या कंपनी ने त्यांच्या शिक्षणाची दखल घेत त्यांचा सन्मान केला.

त्यांच्या या प्राविण्याची दखल घेत त्यांना २०२३ च्या "Forever Star Super Woman Award (Multitalent)" देण्यात आला.

"Glantor X (News)" च्या India's 100 Women Achievers list मध्ये त्यांच्या नावाचा समावेष करण्यात आला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे "Influencer Book of World Records नी त्याची दखल घेत, त्यांना "Record Holder" म्हणून घोषीत करत त्यांचे नाव ह्या "Book of World Records" मध्ये आले आहे.

त्यांना सगळ्या महिलांना सांगावेसे वाटते की लग्नानंतर शिक्षण पुढे सुरू ठेवायला हवे. संसाराची, परिव घेता घेता स्वतःची पण काळजी घ्या. आणि जे काही शिकलात समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करा कायमस्वरूपी आनंद मिळवता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]