जागतिक वाघ्रदिनानिमित्त शेत शिवारात जाऊन मार्गदर्शन 'स्वाब' संस्थेच्या सदस्यांचे अफलातून उपक्रम.



तळोधी (बा.);
     आज *आंतरराष्ट्रीय वाघ्र दिनानिमित्त  'SWAB Foundation'संस्थेच्या सदस्यांनी शेतशीवारात जाऊन मार्गदर्शन केले. तळोधी (बा.) वन परिक्षेत्रातील परिसरातील  सावरला,आकापुर, उश्राळा (मेंढा), गंगासागर हेटी च्या शेतशिवारालगत वाघाचे वास्तव असल्याने व पंधरवाड्या पुर्वी आकापुर येथील एक महिलेचा वाघाच्या हमल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती व वारंवार वर्तमानपत्रांमध्ये माहितीच्या अभावाने दहशत निर्माण करणारे लेख व बातम्यांमुळे  लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. आज त्या परिसरात गस्त करून शेतशिवारात काम करणाऱ्या मजुरांशी, महिलांशी शेताच्या बांधावर जाऊन चर्चा करत वाघापासून बचाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून कशाप्रकारे सावधानता बाळगून आपले प्राण वाचवता येतील, व मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल, याबाबत सूचना केल्या.सोबतच पर्यावरण व मानवी जीवनामध्ये वाघांचे काय महत्त्व आहे याबाबत त्यांना सविस्तर समजवून सांगितले व सोबतच शेतात काम करत असताना किंवा या परिसरामध्ये वावरताना काही महत्त्वाच्या काळजी घेण्याच्या सूचना यश कायरकर यांनी मार्गदर्शन करताना केल्या.
      त्यासोबत पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे घर परिसरात किंवा शेत परिसरामध्ये काम करताना कचऱ्यामध्ये सुद्धा सर्पदंश होण्याच्या घटना खूप वाढलेले आहेत त्यामुळे त्यापासूनही बचाव करण्याचे करण्याबाबतचे मार्गदर्शन केले तसेच मांत्रिकाचा मांत्रिकाच्या नादी न लागता तात्काळ रुग्णालयात जाऊन औषध उपचार करणे तसेच जर अशा काही घटना घडल्या तर आम्हाला किंवा वन विभागाला त्याबाबत तात्काळ सूचना दिल्यास तुमचे अनमोल असे प्रा ण निश्चितच वापर वाचवण्यात मदत होईल याबाबतीत जीवेस सयाम,  यश कायरकर, महेश बोरकर यांनी सापाबद्दलही त्या मजुरांना मार्गदर्शन केले.
      यावेळी संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य जिवेश सयाम, हितेश मुंगमोडे, महेश बोरकर , प्रशांत सहारे, वेदप्रकाश मेश्राम,आकाश मेश्राम ,नितीन भेंडाळे ,शुभम सूरपाम, गणेश गुरूनुले, शुभम निकेसर, विशाल बारसागडे, विकास लोणबले, तुषार शिवणकर, कुणाल रामटेके , गौरव निकुरे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]