महेश तिवारी यांची राज्य अधिस्वीकृती समितीवर निवडन्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ प्रतिनिधी महेश तिवारी यांची पत्रकारांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या  राज्य अधिस्वीकृती या सर्वोच्च समितीवर सदस्य पदी राज्य सरकारने निवड केली आहे.. 
महेश तिवारी हे राज्याचा शेवटचा टोक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील रहिवासी असून दैनिक लोकसत्ता Loksatta मधून त्यांनी पत्रकारितेला 1994 मध्ये सुरुवात केली होती.. तब्बल सहा वर्ष दैनिक लोकसत्ता साठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकारिता केली आहे. 2000 जून पासून ईटीवी etv Marathi मराठीच्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी Ramoji Film City च्या मुख्यालयात कॉपी एडिटर पदावर त्यांची निवड झाली होती. दोन वर्ष हैदराबाद मध्ये ईटीवीच्या मुख्यालयात रामोजी फिल्मसिटीत डेस्कवर काम केल्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे ईटीवी चे प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवण्यात आले. 2001 डिसेंबर पासून 2012 डिसेंबर पर्यंत त्यांनी या दोन्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून अनेक महत्त्वपूर्ण विषयांच्या बातम्या केलेल्या आहेत.. एप्रिल 2013 पासून न्यूज 18 लोकमत news 18 lokmat या वाहिनीचे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्य सुरू केले .न्यूज 18 लोकमत या वाहिनीसाठी काम करत असताना चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक राजकीय अनेक विषयांच्या त्यांनी उल्लेख पूर्ण घडामोडी आणि बातम्या कवर केल्या आहेत. माओवादी चळवळ त्याचा होणारा परिणाम माओवाद्यांच्या हिंसक कारवाया या विषयावर त्यांनी अनेक एक्सक्लूसिव रिपोर्ताज केलेले आहेत. महाराष्ट्र टाइम्स Maharashtra Times या दैनिकासाठी नागपूर आवृत्ती सुरू झाल्यापासून गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.
पञकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे .पत्रकारांसाठी राज्य सरकारची सर्वोच्च अशी राज्य अधिस्वीकृती समिती आहे. या समितीच्या माध्यमातून पत्रकारांना अधिविकृती देण्यासह प्रसार माध्यमांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारसोबत ही समिती काम करते या समितीमध्ये राज्यस्तरीय सदस्य म्हणून महेश तिवारी यांची राज्य सरकारने निवड केली आहे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम भागातील रहिवासी असलेल्या महेश तिवारी यांची राज्य सरकारच्या या सर्वोच्च समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]