सावलीत माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

सावलीत माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न
सावली प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी सावली च्या वतिने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुधिर  मुनगंटीवार वने व पर्यावरण मत्स्य मंत्री तथा पालकमंत्री यांच्या व माजी आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन दिनांक २७ जुलै गुरुवार ला सकाळी नऊ वाजता पासुन तर दुपारी तिन वाजेपर्यंत रक्तदान कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी रक्तदान करुन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन जन्मदिवस साजरा करण्यात आला.रक्तदान शिबीर उपक्रम भाजपा तर्फे सावली तालुक्यात सतत बारा वर्षे निरंतर चालु असून समाजकार्यास भाजपा पदाधिकाऱ्यांचे मोठया प्रमाणात योगदान चालु आहे.
     त्यावेळी मा माजी आमदार अतुल देशकर यांनी सावली येथे भेट दिली.त्यांच्या समक्ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वाढदिवसाच्या जल्लोषात शुभेच्छा दिल्या.त्यानंतर मा माजी आमदार अतुल देशकर यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे योगदान मार्गदर्शन करण्यात आले.व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासुन आभार माणले.
    त्यावेळी संजय गजपुरे जिल्हा महामंत्री भा ज पा अध्यक्ष अविनाश पाल,भा ज पा ता. महामंत्री सतीश बोम्मावार,माजी जि प सभापती संतोष तंगडपल्लीवार, आशिष कार्लेकर ता शहर अध्यक्ष सावली,प्रकाश पा गडमवार, देवराव सा. मुद्दमवार, अशोकजी आकुलवार, किशोर वाकुडकर, सचिन तंगडपल्लीवार,राकेश गोलेपल्लीवार, अर्जुन भोयर,अरुन पाल, विनोद धोटे युवा मोर्चा अध्यक्ष, अंकुश भोपये, राकेश कोनबतुलवार, डॉ.कवठे,किष्णाजी राऊत,राकेश विरमलवार, गौरव संतोषवार, अनिल माचेवार, विठ्ठल येगावार, राहुल लोडेलीवार, इम्रान शेख, आशिष संतोषवार, प्रसाद जक्कुलवार,प्रकाश खंजाजी,मयुर गुरुनुले, महिला जिल्हा उपाध्यक्ष निलमताई सुरमवार,माजी प स सभापती छायाताई शेंडे, शारदा गुरनुले नगरसेविका,गुड्डी सहारे शहर महिला अध्यक्ष,योगीताताई डबले माजी जि प सदस्य, प्रतीभाताई बोबाटे,पुष्पाताई शेरकी,शिंदुताई मराठे, शोभाताई बाबनवाडे तसेच गडचिरोलीची वैद्यकीय टीम डॉ.सिद्धी शृंगी, डॉ.सुबुद नसेरी,सतीश तडकलावार, राहुल वाळके,निलेश सोनवणे,राहुल सिडाम,प्रमोद देशमुख, बंडू कुंभारे, कू.प्राची,कू.वैभवी, कू.स्नेहल गेडाम,भा ज पा कार्यकर्ते व पदाधिकारी,महिला पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सतिश बोम्मावार, आशिष कार्लेकर, निखिल सुरमवार,  यांनी अथक परिश्रम घेतले होते.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा राऊत यांनी केले तर आभाप्रदर्शन सौ.निलमताई सुरमवार यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]