सरस्वती विद्यालयात नोटबुक, डिजीटल पाटी व सायकलचे वाटपयेथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील  कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात संस्थापक स्व. इंजि. किशोरजी बारापात्रे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक, डिजीटल पाटी व सायकलचे वाटप नुकतेच करण्यात आले.
      जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगाव तथा सरस्वती विद्यालय कोजबी (चक) चे संस्थापक स्व. इंजि. किशोरजी बारापात्रे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय बारापात्रे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थासचिव मनीषाताई बारापात्रे, सदस्य रमेश मस्के, इंजि. संकेत बारापात्रे, इंजि. उत्कर्ष बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे  उपस्थित होते. यावेळी  वर्ग ५ ते १० च्या सर्व विद्यार्थ्यांना सदर वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी   शिक्षणावर लक्ष केंद्रीत करुन आपला व शाळेचा नावलौकीक वाढवावा. त्यासाठी लागणा-या शालेय  वस्तू संस्थेकडून तहहयात पुरवल्या जातील  असे आश्वासन इंजि. संकेत बारापात्रे यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश खोब्रागडे तर आभार सुरेश बोरकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]