वर्षा भांडारकर यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते सत्कार

नवभारत विद्यालय मूल येथील शिक्षिका सौ वर्षा भांडारकर ह्या निसर्गप्रेमी व पर्यावरण संवर्धन या पुरस्काराने सन्मानित


दि.23/07/2023रोज रविवारला स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन व जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळ्यात नवभारत विद्यालय मूल येथील शिक्षिका पर्यावरण सखी सौ.वर्षा भांडारकर मॅडमला निसर्ग प्रेमी पर्यावरण संवर्धन हा पुरस्कार सन्माननीय पालकमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार व झाडी बोलीतील जेष्ठ कलावंत पद्मश्री पुरस्कारविजेते श्री.परशुरामजी खुणे यांच्या हस्ते
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरव शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.. गेल्या पंधरा वर्षांपासून सौ.भांडारकर मॅडम ह्या निस्वार्थ भावनेने निसर्ग संवर्धनाचं कार्य करीत आहेत...रोप स्वतः तयार करणं, सिडबाॅल तयार करून मोकळ्या जागेत टाकणं... प्रत्येक कार्यक्रमात रोप भेट देणं...व चार्ट द्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणावर माहिती देणं..प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगणं...शोषखड्याबाबत माहिती.्देणं आणि सोबतच कविता चारोळ्या व लेख लिहून पर्यावरण जणजागृती करत आहेत....अश्या विविध उपक्रम ह्या राबवित असतात... यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.एच.झाडे सरांनी, पर्यवेक्षक श्री मुंडरे सरांनी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका सहकाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला
तसेच यांच्या परिवारानी चाहत्यांनी, जीवलग मैत्रिणींननी शुभेच्छा देऊन पाठ थोपटली.... अतिशय आनंददायी हा सोहळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]