दलितमित्र वि.तु नागपुरे यांचे विचार परिसरात पसरवा अॅड. बाबासाहेब वासाडे यांचे आवाहनस्व. नागपुरे यांचे शेतकऱ्या प्रती, ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या प्रतीचे  विचार परिसरात पसरविणे ही काळाची गरज असल्याचे मत ऍड. बाबासाहेब वासाडे  यांनी व्यक्त केले. ते   कर्मवीर महाविद्यालय मूल येथील वी. तू. नागपुरे यांचे जयंती निमित्त आयोजित  कृषी व पर्यावरण दिन,या कार्यक्रमा ला संबोधित करताना बोलत होते.
     पुढे बोलताना ते म्हणाले खेड्यातील शेतकऱ्यांचा मुलांना चांगले शिक्षण कसे देता येईल हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन त्यांनी ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या, त्या काळात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उत्तम शिक्षकांची सोय करून दिली, त्याचच फलित आज मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखेतून शिकलेला विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात  उत्तम पदावर आपली सेवा देत असल्याचे बघायला मिळत आहे.  स्व. वकील साहेबांनी लावलेलं हे शैक्षणिक रोपट आज विशाल वटवृक्ष झाल्याचे बघायला मिळते आहे.
      सदर कार्यक्रम स्व. वी. तू. नागपुरे कार्य व सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब वासाडे यांचे अध्यक्षतेखाली तर  स्व. वी तू नागपुरे सामाजिक कार्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड, अनिल वैरागडे, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, सदस्य शशिकांत धर्माधिकारी, प्रा. किसन वासाडे, माजी जी प सदस्य तांगडे, निवृत्त्त प्राचार्य,ते. क. कापगते , प्राचार्य, डॉ.अनिता वाळके, मुख्याध्यापक अशोक झाडे, सुधाकर पुराम, अल्का राजमलवार , अजय कोंडेकर, भगत  सर,  यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.  स्व. वी.तू. नागपुरे, आणि स्व. मा. सा. कन्नमवार यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आले. यावेळी  साप्ताहिक पब्लिक पंचनामा चे संपादक विजय सिद्धावर  यांनी स्व. वी तू नागपुरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशित केलेल्या  पुरवणीचे  प्रकाशन  करण्यात आले. 
    आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील आदर्श प्रगतशील शेतकरी म्हणून राजोली येथील राजेंद्र शेंडे यांचा, तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून गडीसूर्ला येथील प्रशांत कवासे , संस्थेतील आदर्श शिक्षक म्हणून प्रा. डॉ.गणपत आगलावे , तर आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून राजोली येथील अशोक झाडे यांचा  शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 
     यात  वर्ग दहावी आदित्य सोनुले मूल 90.60%, सक्षम गगपल्लिवार मूल  92.20%, प्राची प्रकाश पंधरे मूल 93%, रेहानी कोहळे  व्याहाड (बुज)94%, शबनम पठाण रजोली 85.40%, विक्की गुरनूले अंतरगाव 78.40%   आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत पलक फलके मूल विज्ञान 78.50%, पुप्रिया भांडेकर व्याहाड बूज. 69.83%,  हर्षा मेंदुळकर राजोली 74.33%,  शुभम चुदरी मूल 84.17%,  ट्विंकल उईके मूल 71.33%, प्रणय राऊत मूल 65.17%, पंकज कावळे, 65.83%,  या उत्तम गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्मुर्ती चिन्ह प्रमाणपत्र देऊन, गौरव करण्यात आला. संस्थेतील प्रदीर्घ सेवा देऊन निवृत्त झालेल्या   मुख्याध्यापक राजीव येनुगवार , सौ.मंगला सुंकरवार ,  शिक्षिका सौ. वसुधा दुबेवार,  सौ. स्मिता बांडगे , अशोक येरमे, या कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ व स्मृति चिन्ह देऊन  सत्कार करण्यात आला. 
  कार्यक्रमात ऍड.वैरागडे, डॉ. बोकारे , धर्माधिकारी यांनी  स्व.वी तू नागपुरे यांचे जीवन चरित्र विषद केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.अनिल वैरागडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणपत आगलावे यांनी तर आभाप्रदर्शन डॉ. आनिता वाळके यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]