शेगाव परिसरातील गावातील अनेक शेतजमीन पाण्याखाली ...तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी..।अभिजात पावडे

वरोरा.. जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव परिसरातील चारगाव मध्यम प्रकल्प धरणाच्या महापुरामुळे येथील परिसरातील नाले, नहर ओवर फ्लो भरून वाहत असून हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली आली असून शेतात असलेल्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले अतिवृष्टी पाण्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.. 
 सविस्तर असे की बुधवार ला झालेल्या मुसळधार पावसाने चारगाव धरणाला बढती आली असून ईरई,चंदई नदीला महापूर आला असून पुराचे पाणी सैरावैरा धावत अनेक शेतामध्ये घुसले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीपिके वाहून गेले असून शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अतिवृष्टी पावसामुळे शेत पिकाचे मोठे नुकसान होत आहे.करिता संबधित विभागाने, तहसीलदार यांनी तात्काळ या भागाची पाहणी करून तात्काळ मोका चौकशी करून पीडित पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी परिसरातुन होत आहेत...  शेगाव परिसरात चारगाव बू , चारगाव खुर्द , अर्जुनी , कोकेवाडा तु  दादापुर, धानोली,आदी गावातील अनेक शेतकऱ्याच्या शेतजमीन नदी लगत असल्याने सर्वाधिक नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे तसेच कोकेवाडा तू. येथिल प्रतीक खिटरकर यांची सर्वाधिक  शेत जमीन नदी लगत असलेल्या पुराच्या पाण्यामुळे धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे युवा शेतकरी प्रतीक खिरटकर यांनी सांगितले असून तेव्हा या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून पीडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अभीजीत पावडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी प्रशासनाला केली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]