भगवान श्री श्रीकृष्ण शिक्षण (बी.एड.) महाविद्यालय तळोधी (बा) चे १० विद्यार्थी मेरीट यादीमध्ये.महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते होणार सत्कार._
 तळोधी (बाळापुर) वार्ताहर
            कल्याण शिक्षण संस्था, नागपूर द्वारा संचलित भगवान श्री श्रीकृष्ण शिक्षण (बी.एड) महाविद्यालय तळोधी (बाळापुर) येथील शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मध्ये झालेल्या उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये गोंडवांना विद्यापीठ, गडचिरोलीच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतून महाविद्यालयाचे एकूण १० विद्यार्थी मेरिट यादीमध्ये आलेले आहेत.
मेरिट यादीमध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या दहाव्या पदवीदान दीक्षांत समारंभामध्ये महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दि.५ जुलै २०२३ रोजी  सत्कार होणार आहे. त्यामध्ये प्रथम मेरिट आलेले राहुल गुरुदेव फटाले या विद्यार्थ्याला सुवर्णपदकांनी गौरविण्यात येणार आहे.
     महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मेरिट यादीमध्ये येण्याची परंपरा कायम ठेवली असून यावर्षी  महाविद्यालयाचे एकूण १० विद्यार्थी  मेरीट मध्ये आलेले आहेत. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
    गुणवत्ता यादीमध्ये प्रथम- राहुल गुरुदेव फटाले (९.६० सीजीपीए), द्वितीय- प्रणय गुलाब माकडे (९.६० सीजीपीए), तृतीय-कु. शितल शिशुपाल आनंदे (९.५५ सीजीपीए), चतुर्थ-अक्षय रमेश तिवाडे (९.५५ सीजीपीए), पाचवी -कु.शैवाली दिलीप शेंडे (९.५५ सीजीपीए) , सहावी- कु. जयश्री सुदाम जोगी (९.४८ सीजीपीए), सातवी-कु. अंकिता भगवान वसाके (९.४३ सीजीपीए), आठवी-कु. मोनाली सदानंद बोरकर (९.३५ सीजीपीए),  नववी- कु.रवीना बौद्धप्रकाश नागदेवते (९.३५ सीजीपीए), दहावी-कु.रागिनी दिवाकर गहाणे (९.३० सीजीपीए), यांनी अनुक्रमे मेरिट प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आहे.
   महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कल्याण शिक्षण संस्था, नागपूर चे अध्यक्ष उन्मेष गेडाम, सरचिटणीस सौ. मालतीताई गेडाम, महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉ. रजनी शिवणकर तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित सर्व शैक्षणिक शाखांचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]