बापूपेठ बायपास लगतच्या नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन : आम आदमी पार्टी चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभाग हा अनेक समस्याने ग्रस्त असलेला असून महानगरपालिका प्रशासनाचा याकडे अक्षरशः  दुर्लक्ष होत असते. असाच एक उदाहरण म्हणजे बल्लारशाह बायपास मार्गावरून गाडगेबाबा चौक महादेव मंदिर कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर नाल्याची घाण रस्त्यावरून वाहत असल्याने  अनेक प्रवाश्यांना तसेच आजूबाजूचा लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत आम आदमी पक्षाचे शहर सचिव राजू कूडे यांचा नेतृत्वात महानगरपालिका तसेच बांधकाम विभाग यांना तात्काळ या नाल्याचे काम करण्याकरिता निवेदन तसेच रास्ता रोको आंदोलन आज आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले येथील जनतेने त्यांना होत असलेल्या त्रासाचा बद्दल आपली व्यथा आम आदी पक्षाच्या शिष्टमंडळा जवळ मांडले अनेक शाळकरी मुले मुली जेष्ठ नागरिक या मार्गाने पळून त्यांना दुखापत होत असताना सुद्धा येथील नगरसेवक आणि मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्यांनी सांगितले.
आज आम आदमी पार्टीच्या वतीने प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला असून दोन दिवसात जर या समस्या सोडवण्या करिता महत्त्वाचे पाऊल उचलले गेले नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सरळ बजावून महानगरपालिका प्रशासन तसेच बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले. या वेळेला आपचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजू  कुडे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर संघटन मंत्री रहमान खान पठाण, शहर सहसचिव सुधीर पाटील, अमित बुरबांडे, शुभम वाघाडे, सचिन भटरकर, महेश खाडिलकर, संजय बुरडकर, अतुल जयपुरकर, करण बोरसरे, हर्षल कोराटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]