गोंदोडा लगत असलेल्या वडशी येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा सुरू

महसूल प्रशासन झोपेत

सत्ताधारी पक्षाच्या कंत्राटदाराचेच काम

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोवन भूमी म्हणून ओळखला जाणारा गाव म्हणजे गोंदोडा या गावाकडे अनेक राजकारणी लोकांची नजरे टिकून राहतात. आज आपण बघतो कि मोठ्या प्रमाणावर तुकडोजी महाराज यांचे अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर तुकडोजी महाराजांचा सुरूवातीचा काळ म्हणजे रामटेक, सालबर्डी, रामदिघी आणि गोंदोडा या घनदाट जंगलांमधे व्यतीत झाला. ते आडकोजी महाराजांचे शिष्य होते. तुकडोजी महाराजांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या निर्माणासोबत, सामाजिक सुधारणांमधे देखील सहभाग घेतला. त्यांनी “ग्रामगीता’’ देखील लिहीली.
या ग्रामगीतेत महाराजांनी गावाच्या विकासाकरीता लागणाऱ्या साधनांचे वर्णन केला आहे.त्यांच्या व्दारे सुरू झालेली अनेक विकासांची कामं आज देखील उत्तम रितीने सुरू आहेत.भारतीय डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ तिकीट प्रकाशित करून त्यांना सन्मानित देखील केले आहे. त्यांच्या सन्मानार्थ नागपुर विद्यापीठाचे नामकरण “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ’’ असे ठेवण्यात आले आहे.आणि अशा पावन भूमीमध्ये चोरी सारखा प्रकार निंदनीय आहे.व हा मुरुम चक्क गोंदोडा ते वडशी जाणाऱ्या डांबर रोड ची सायडींग भरण्यासाठी नियम बाह्य पध्दतीने वापरल्या जात आहे.आणि हे काम सत्ताधारी पक्षाच्याच कंत्राटदाराचे आहे.तहसीलदार यांच्याकडे सुद्धा गावकऱ्यांनी याबाबत ची संपूर्ण माहिती दिली असता तलाठी , सरपंच , ग्रामसेवक , मंडळ अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा याकडे पाठ फिरवली असे दिसून येत आहे.याकडे मायनिंग चे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]